कळंब ( शिवप्रसाद बियाणी

शहरात ठिकठिकाणी साचत असलेल्या कचऱ्यामुळे व अस्वच्छ तेमुळे  शहरातील वातावरण दुषित झाले आहे. त्यातच कोरोना काळात न.प.ने  नागरिकांना दूषित व दुर्गंधीयुक्त पाणी नळाला येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.शहराची स्वच्छता व पाणी प्रश्न या वर विशेष सभा बोलवावी असे निवेदन जिल्हाधिकारी यांना शिवसेनेच्या वतीने देण्यात आले.

 नगरपालिका प्रशासनाकडून  शहराच्या अनेक भागात आस्वच्छतेचे तिनतेरा वाजले आहेत. या साठी शासनाकडून स्वच्छ शहर सुंदर शहर संकल्पनेला प्रोत्साहन देण्यात येत असले तरी स्थानिक प्रशासनाकडून मात्र स्वच्छतेला बगल दिल्याचे दिसून येते.    ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसून येत आहेत अस्वच्छता दिसत असल्याने शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे.तसेच नागरिकांना दुर्गंधी चा सामना करावा लागत आहे. नगरपालीकेव्दारां शहरातील नळाला गेल्या काही दिवसापासून दुर्गंधी युक्त आणि पिवळे पाणी देण्यात येत आहे वेळोवेळी तक्रारी करून ही प्रशासन मात्र याची दखल घेण्यास टाळाटाळ करत आहे यामुळे नागरीकांच्या आरोग्याशी व जीवाशी जाणून - बुजून तर न.प.प्रशासन खेळत नाही ना असा प्रश्न सर्वामान्यांना पडला आहे. 

सद्या शहरात स्वच्छतेचे तिन तेरा वाजले आहेत. शहरातील सर्वच प्रभागात घाणीचे साम्राज्य पसरले आहे प्रतिमहा लाखों रूपये खर्च करूनही स्वच्छता होत नाही तसेच धरणामध्ये मुबलक पाणी साठा असतानाही, शहरातील नागरिकांना स्वच्छ व मुबलक पाणी मिळत नाही गेल्या काही महिन्यापासुन नळाद्वारे काळे पिवळे व दुर्गंधी युक्त पाणी येत असल्याने अबालवृध्दांच्या प्रकृतीच्या तक्रारी वाढलेल्या आहेत याकडे न प चे दुर्लक्ष होत आहे. पाण्यासाठी भर उन्हात नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. तसेच शुध्द पाणी मिळण्यासाठी शहरातील मोक्याच्या ठिकाणी पाणी फिल्टर मशीन (ए. टी. एम.) बसवण्यासाठी शेड उभे केले आहेत, पण त्यात अद्यापही पाणी सोडलेले नसल्याने हे शेड म्हणजे ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशी स्थिती निर्माण झाली आहे तरी स्वच्छता व पाणी प्रश्नांवर विशेष सभा बोलावून त्या सभेला प्रत्येक प्रभागातील जाणकार नागरिकांनाही बोलवण्यात यावे, अशी सुचना न प मुख्याधिकारी यांना देण्यात यावी अश्या मागणीचे निवेदन .जिल्हाधिकारी यांना देण्यात आले,या निवेदनावर शिवसेनेचे गट नेते शिवाजी आप्पा कापसे,नगरसेवक मुस्ताक कुरेशी,सौ.मीराताई चोंदे,अनंत वाघमारे,सौ.अश्विनी शिंदे,सौ.सुरेखा पारख,सतीश टोणगे, यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

 
Top