उस्मानाबाद / प्रतिनिधी-

जिल्ह्यातील रस्त्यांची अवस्था अतिवृष्टीमुळे व वाहतुकीमुळे मोठ्या प्रमाणात खराब झाली होती. सदरील सर्व खराब रस्त्याने ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, रुग्णांना ये-जा करण्यास मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत होत्या.  संबंधीत परिसरातील नागरिकांकडून रस्त्यांची दुरुस्ती करणेबाबत लोकप्रतिनिधींकडे वारंवार मागणी करण्यात येत होती. त्या अनुषंगाने प्रधानमंत्री ग्रामसडक योजना विभागाच्या उप अभियंता, कार्यकारी अभियंता व कनिष्ठ अभियंता यांच्या समवेत कृती आराखडा तयार करण्यात आला होता.  सदर रस्त्यांच्या मंजुरीसाठी केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री  .नरेंद्रसिंह तोमरजी व प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे संचालक श्री इंद्रेशकुमार पटेरिया यांच्याकडे उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी सदर रस्त्यांच्या पुन:निर्माणासाठी पाठपुरावा केला. सदर पाठपुराव्याला यश आले असून जिल्ह्यातील रस्त्यानंसाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत निधी मंजूर झाला आहे.

यामध्ये उस्मानाबाद तालुक्यातील- बरमगाव (बु) ते राज्य मार्ग 238 – रुईभर – गौडगाव – अनसुर्डा रस्ता 767.51 लक्ष, तेर-बुकनवाडी- गोरेवाडी तालुका सरहद्द पर्यंत रस्ता 938.42 लक्ष, घाटंग्री ते खताळवाडी-गडदेवदरी-कुमाळवाडी रस्ता 707.55 लक्ष

तुळजापूर तालुक्यातील - जळकोट-मानमोडी-चिंचखोरी तांडा रस्ता 734.06 लक्ष, जळकोट ते जळकोटवाडी रस्ता 471.38 लक्ष, वानेगाव ते सलगरा (दि) रस्ता 676.3 लक्ष

उमरगा तालुक्यातील- गुंजोटी ते एकोंडी (ज)-एकोंडीवाडी-दाबका रस्ता 732.75 लक्ष, लोहरा तालुक्यातील जुना माकणी रस्ता ते जुना सास्तुर रस्ता 530.64 लक्ष

कळंब तालुक्यातील - उपळाई- संजीतपुर रस्ता 232.35 लक्ष., बोरवंटी- कोथळा- हिंगणगाव रस्ता 355.44 लक्ष.,  शिराढोण-ते रायगव्हाण- जायफळ रस्ता 429.42 लक्ष,  राज्यमार्ग 241 - नागझरवाडी ते तालुका सरहद्द रस्ता  549.82 लक्ष.

भूम तालुक्यातील- दुधोनी ते जिल्हा सरहद्द रस्ता 483.28 लक्ष

परंडा तालुक्यातील- आवाडपिंपरी- वडनेर- ढगपिंपरी- आसू रस्ता 749.56 लक्ष., चिंचपुर (खुर्द)- माणिकनगर रस्ता 867.02 लक्ष.

वाशी तालुक्यातील - वाशी ते सरमकुंडी रस्ता 448.24 लक्ष., वाशी ते गोलेगाव-ईसरुप-खानापूर रस्ता 472.28 लक्ष अशा एकूण जिल्ह्यातील 120 किमी लांबीच्या 17 रस्त्यांसाठी एकूण 101.46 कोटी निधी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत मंजुर झाला आहे.

 
Top