उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद शहरातील उंबरे कोठा येथील कस्तुरबाई श्रीपतराव उंबरे (वय 90) यांचे बुधवारी दि, 14 रोजी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांच्या पार्थिवावर बार्शी रोड वरील हातलाई मंदिराजवळ शेतात मोजक्या लोकांत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात 4 मुले, 1 मुलगी, सुना, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. त्या माजी नगराध्यक्ष भाऊसाहेब उंबरे  तेरणा पब्लिक स्कूलचे सचिव अनंतराव (बाबा) उंबरे, विज वितरण कंपनीतील सेवानिवृत्त अधिकारी देविदास उंबरे, हभप, वसंत महाराज उंबरे, सौ, सुरेखा (मीना) रविंद्र सावंत (रा, जागजी) यांच्या आई होत. तसेच माजी नगराध्यक्ष मधुकरराव तावडे यांच्या बहीण होत्या.


 
Top