उस्मानाबाद / प्रतिनिधी

कोरोना संकट काळातील विज बिल,घरपट्टी व नळपट्टी माफ करुन सर्व सामान्यांना न्याय देण्याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनातुन सामाजिक कार्यकर्ते गणेश रानबा वाघमारे यांनी मागणी केली आहे. 

 कोव्हिड-19 चा प्रार्दुभाव वाढतच असुन परत लाॅकडाऊन नियम अटीचा परिणाम सर्व सामान्य जनतेच्या उदरनिर्वाहावर मोठ्या प्रमाणावर झाला असून जगणे मुश्किल झाले आहे.बांधकाम कामगार, शेतमजूर,घरेलु कामगार,पेंटर, सुतार,फुटपाथवर चप्पल शिवणारे,चहा पाणी विक्री करुन उपजिविका भागविणारे छोटे उद्योजक,पिग्मी एजेंट,सलुन, रिक्षावाले यांना मोठा फटका बसत आहे,लाॅकडाऊन त्यात वाढती महागाई यापासुन सामान्य भारतीय नागरिक अस्वस्थ झाला आहे तरिही शासनाच्या नियम अटीचा सम्मान करुन जनता पालन करित आहे.शासनाने यावरती उपाय योजना केली पाहिजे.अशा वेळेवर मात केली पाहिजे,कोरोना पासुन नागरिकांच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी नियोजन केले पाहिजे,या देशाने या राज्याने पुर्वी काळापासून डेंग्यू मलेरिया, क्षयरोग, एड्स,कॅन्सर यासारख्या भयानक अशा महामारी रोगांवर त्या त्या वेळी यशस्वी नियोजन केले,त्या वेळी इतके प्रगत तंत्रज्ञान ही नव्हते,आज प्रगत तंत्रज्ञान असतांनाही कोरोनाचा शिरकाव झपाट्याने वाढतोय कसा..? यावर चिंतन झाले पाहिजे,कोरोना काळातील विज बिल हे सन 2020 व 2021 मधिल पुर्ण पणे माफ झाले पाहिजे तर घरपट्टी व नळपट्टी तिन वर्षाची माफ झाली पाहिजे कारण सर्वसामान्यांना या कोरोना संकटातुन बाहेर पडण्यासाठी बराच कालावधी लागणार आहे.अशा प्रकारची मागणी सामाजिक कार्यकर्ते गणेश रानबा वाघमारे यांनी जिल्हाधिकारी मा.कोस्तुभजी दिवेगावकर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

 
Top