कळंब ( शिवप्रसाद बियाणी

गेल्या तीन वर्षापासून वळण (बायपास) रस्त्याचे काम रखडले असून, याकडे न. प.चे  अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. हे काम करणारी एजन्सी,कंत्राटदार,यांचे गिनीज बुकात  नाव नोंद करण्यासाठी व त्यांना पुरस्कार देण्यासाठी न. प.ने शिफारस करावी. शहरातील अनेक कामाची मुदत संपलेली असतानाही काम पूर्ण झालेले नाहीत तात्काळ काम सुरू न केल्यास रस्त्यावर झोपून आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेचे नगरसेवक सतीश टोणगे यांच्यासह त्या भागातील नागरिकांनी दिला आहे.

   मुख्याअधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की शहराच्या बाहेर जाणाऱ्या वळण रस्ता (बायपास) चे काम गेल्या तीन वर्षापासून रखडलेले आहे. या कामाची मुदत संपलेली असतानाही काम बंद असून याकडे प्रशासन, पदाधिकारी यांचे दुर्लक्ष आहे. हे काम करणाऱ्या गुत्तेदार एजन्सीची गिनिज बुकात नोंद होण्यासाठी न. प.ने शिफारस करावी अशीही मागणी करण्यात आली आहे. शहरात अनेक कामे अर्धवट असून ती तात्काळ पूर्ण करण्यात यावे नसतां याच रस्त्यावर झोपून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

   या निवेदनावर या नगरसेवक सतीश टोणगे , चर्मकार युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष विकास कदम, मारुती माने ,राजाभाऊ गरड, पोपट जगताप,सोमनाथ वाघमारे, महेश दळवी, बाबुराव सुरवसे ,हिम्मत मंडाळे,बालाजी देशमाने, यांच्या स्वाक्षर्या आहेत.

 
Top