तुळजापूर / प्रतिनिधी-

 उस्मानाबाद - तुळजापूर - सोलापूर या 80 किलोमीटर रेल्वे मार्गा बाबतीत राज्य सरकार बेफिकिर असल्याचा आरोप करुन या प्रश्नी परिवहन मंञी अँड अनिल परब यांनी विधानसभेत चुकीचे उत्तर दिल्याने त्यांच्यावर   हक्कभंग प्रस्ताव आणणार  असल्याची माहीती तुळजापूर विधानसभा मतदार संघाचे आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी पञकार परिषद घेवुन दिली .

शाषकिय विश्रामधाम येथे आयोजित पञकार परिषदेत बोलताना आ पाटील  पुढे म्हणाले की,  उस्मानाबाद - तुळजापूर - सोलापूर हा रेल्वे मार्ग फायदेशीर असल्याने खास बाब म्हणून केंद्राने यास मंजुरी दिली.

२००५ साली या प्रकल्पाचा खर्च १८९.कोटी ४७लाख रुपये होता तो आज स्थितीत ९०४ कोटी ९२ लाख रुपये किमतीचा झाला आहे. 2014ला पंतप्रधान नरेंद्र मोदीनी तिर्थक्षेञ तुळजापूर रेल्वेचा नकाशावर आणणार असल्याचे जाहीर सभेत सांगितले होते.व 2017 साली 958 कोटीचे या महामार्गासाठीचे नवीन ईस्टमेटप्रोजेक्ट रिपोर्ट  बनवले व पिंकबुक मध्ये ही हा प्रकल्प घेतल्याचे यावेळी सांगितले .

या मार्गाचा निधी तरतूद  बाबतीत मी व सुभाष देशमुख  यांनी प्रश्न विचारला असता पर्यावरण मंञी अँड अनिल  परब उत्तर देताना म्हणाले कि हा संपुर्ण  प्रकल्प केंद्राचा अर्थिक सहभागाने करण्यास केंद्र शासनाने  7/2/2019च्या आदेशान्वय मान्यता  दिल्याचे उत्तर दिले असे विधान विधानसभेत करणे चुकीचे  असुन जखमी वर मीठ चोळल्या सारखे व बेफिक्रीचे असल्याची टीका यावेळी केली केंद्र व राज्य शासनाच्या समान भागीदारीने ५०-५०  टक्के अर्थिक सहभागाने  हा प्रकल्प करण्याचे पुरावेपञ यावेळी सादर केले नाँटी सरकारचे नाँटी उत्तर असल्याची टीका यावेळी केली .हा जिल्हयातील महत्वाचा प्रकल्प असुन याचा पाठपुरावा आम्ही करणारच असे शेवटी सांगितले .यावेळी नगराध्यक्ष सचिन रोचकरी आनंद कंदले गुलचंद व्यवहारे उपस्थितीत होते.

 
Top