परंडा / प्रतिनिधी : - 

सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त परांडा तालुक्यातील जि.प.प्रा. शाळा घारगाव येथे “एस फॉर स्कूल” या संस्थेने मोबाईल लायब्ररी परांडा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी अनिता जगदाळे-सुलतानपुरे  यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली.

संयुक्त राष्ट्र संघातर्फे जगभरात देअर-वर्ल्ड-वर्ल्ड ऍट स्कूल हा उपक्रम सुरू आहे.याच उपक्रमाअंतर्गत पुणे येथील आय टी अभियंता असलेले चेतन परदेशी यांनी “एस फॉर स्कूल” या संस्थेची स्थापना केली आहे. या संस्थेने महाराष्ट्रातील 1600 हून अधिक शाळा बाह्य मुलांना शैक्षणिक मदत करून शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त केले आहे. याचाच एक भाग म्हणून विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण, अवांतर वाचनाची गोडी निर्माण व्हावी म्हणून सुमारे200 पुस्तके असलेली मोबाईल लायब्ररी सुरू केली आहे. यामध्ये गोष्टी, चरित्रे, कथा, कॉमिक्स, विज्ञान, अंतराळ इ संदर्भात मराठी व इंग्रजी पुस्तके यांचा समावेश आहे ग्रामीण भागातील विद्यार्थी तासनतास इंटरनेट च्या युगात मोबाईल गेम व टी व्ही मध्ये डोकी घालून बसलेली असतात त्यामुळे वाचनाची गोडी निर्माण होऊन त्यांच्या ज्ञानात, आकलनात भर पडेल.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष नंदूलटके हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रप्रमुख चंद्रकांत बेळे,विषयतज्ञ अरविंद बाराते, हे होते.यावेळी मुख्याध्यापक सतिश गुरव,शशिकांतलटके, अमोल काळे, सचिन सुरवसे ,सुमंत उमापयांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक नारायण इंगळे यांनी केले तर आभार प्रदर्शन उदारकर्ण पवार यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  सिकंदर तांबोळी, महेश इनामदार,गोविंद मोहरे यांनी परिश्रम घेतले.“ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे संभाषण कौशल्य, आत्मविश्वास, शब्द साठा वाढावा,यासाठी मोबाईल लायब्ररी ची संकल्पना तयार करण्यात आली. या उपक्रमांतर्गत इंग्रजी व मराठी पुस्तकाचे फिरते ग्रंथालय तयार करण्यात आले आहे”


 
Top