उस्मानाबाद / प्रतिनिधी:

कोरोना विषाणूने बाधित झालेल्या नवीन ५२ रुग्णांची भर पडली असून ३६२ रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. तसेच कोरोना बाधित रुग्णांपैकी आज २८ व आजपर्यंत १६ हजार ८९२ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.६८ टक्के आहे. 

आज तुळजापूर तालुक्यातील गंधोरा येथील एका ७२ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला असून आजपर्यंत रुग्ण दगावली असून मृत्यूचे प्रमाण ३.३० टक्के आहे.  जिल्ह्यातील ३५० जणांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र परिसरात असलेल्या कोविड विषाणू तपासणी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. या सर्व नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला असून त्यापैकी २० नमुने पॉझिटिव्ह व ५ नमूने संदिग्ध तर ३२५ नमुने निगेटीव्ह आढळले आहेत. तसेच ३७३ जणांची ॲन्टिजेन तपासणी करण्यात आली असून यापैकी ३२ पॉझिटीव्ह व ३४१ नमूने निगेटीव्ह आढळले आहेत. तर आजपर्यंत १ लाख ३६ हजार ५८७ जणांची स्वॅब व ॲन्टिजेन तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी १७ हजार ८४२ जणांना कोरोना विषाणूंची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले असून पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण १३.८३ टक्के आहे. तसेच स्वॅब व ॲन्टिजेनद्वारे पॉझिटीव्ह आढळलेल्या रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे - उस्मानाबाद - (६-१०) १६, तुळजापूर - (१-४) ५, उमरगा - (३-८) ९, लोहारा - (३-२) ५, कळंब - (३-३) ५, वाशी - (३-२) ५, भूम -(१-०) १ व परंडा (०-४) ४ अशी एकूण (२०-३२) ५२ रुग्ण संख्या आहे.

 
Top