परंडा / प्रतिनिधी:

दि. १२- महाराष्ट्र राज्य ग्रामिण जीवनोती अभियान उमेद व महाराष्ट्र ग्रामिण बँक शाखा -अनाळा ता. परंडा यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त कर्ज मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याचे उदघाटन अनाळाचे सरपंच जोतीराम क्षिरसागर व पं.स. सभापती अनुजा दैन याच्या हस्ते क्रांतीजोती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करुन करण्यात आले. 

महाराष्ट्र ग्रामिण बँकेचे शाखा व्यवस्थापक सावंत, उपशाखाधिकारी जाधव,तालुका अभियान व्यवस्थापक माणिक सोनटक्के, मिडीया सेलचे तालुका अध्यक्ष निशिकांत क्षिरसागर , ग्रा.प. सदस्य कल्याण शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. या मेळाव्यात अनाळा परिसरातील मलकापूर, कुक्कडगांव, चिंचपूर [ खु] , देवगांव आदी गावातील ५० स्वं.स. समूहांना एकूण पंचावन्न लाख रुपये कर्ज मंजरीचे पत्र शाखा व्यवस्थापक सावंत व मान्यवरांच्या हस्ते महिलांना ‘ वितरित करण्यात आले. यावेळी शाखा व्यवस्थापक सावंत यांनी समुहातील महिलांना मार्गदर्शन केले. स्वं.स. समुहातील महिलांनी घेतलेल्या कर्जापासून छोटे -मोठे व्यवसाय करून आपला विकास साधावा, कर्जाचे हप्ते वेळेवर भरावेत, बँकेचे व्यवहार समजून घेणे. समुहातील महिलांनी  योग्य प्रकारे कर्ज फेड केल्यास वाढीव कर्ज देण्यास बँक तत्पर असल्याचे सांगितले. तालुका अभियान व्यवस्थापक माणिक सोनटक्के व निशिकांत क्षिरसागर यांनी ही यावेळी महिलांना महिलांना मागदर्शन करून जागतिक महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. मेळाव्यासाठी परिसरातील स्वं.स. समुहाच्या महिलांची मोठया प्रमाणात उपस्थिती होती.मेळावा यशस्वी करण्यासाठी प्रभाग समन्वयक प्रिया पाटील, समाधान माळी, चांदणे, अनाळा येथील प्रेरिका नौशाद शेख, रेणुका सुर्वे, कृषी सखी राणी रेवडे यांनी अथक परिश्रम घेतले सुत्रसंचालन व आभार प्रभाग समन्वयक समाधान माळी यांनी केले.


 
Top