उस्मानाबाद / प्रतिनिधी:

येथील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात जागतिक दिनी  महिलांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन अधिष्ठाता डॉ.खापर्डे यांच्या उपस्थिीत उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ॲड.सौ.वैशाली देशमुख उपस्थित होत्या.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्टाफ कौन्सिलच्या सेक्रेटरी डॉ.वीणा पाटील यांनी केले.

  या  कार्यक्रमास सर्व गटातील एक महिला प्रतिनिधीचा सत्कार करुन त्यांना मंचावर विराजमान होण्याचा बहुमान देण्यात आला.ॲड.वैशाली देशमुख यांनी महिला सक्षमीकरण,सबलीकरण आणि महिलांसाठीचे कायदे या विषयी मार्गदर्शन केले.

डॉ.खापर्डे यांनी महिलांमध्ये असणाऱ्या अनेक पैंलुचे विवेचन केले.तसेच एक महिलाच माहिलेच्या प्रगतीला बंधने घालत असते.याबद्दल खंत व्यक्त केली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.खोत आणि डॉ.जाधव यांनी केले. श्रीमती डॉ.लिलके यांनी आभार मानले.

 
Top