उस्मानाबाद/ प्रतिनिधी

 शहरातील हनुमान चौकातील एका विवाहित महिलेने २ मार्च रोजी सायंकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिस कर्मचारी हरिभाऊ कोळेकर यांनी बंदुकीचा धाक दाखवून अत्याचार केल्याने आपण आत्महत्या केल्याचे सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे. याप्रकरणी तपास करून आरोपीला शिक्षा देण्याची मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली.

पोलिस अधीक्षकांना निवेदनात म्हटले आहे की, पीडित कुटुंबाला शासकीय योजनेंतर्गत आर्थिक सहाय्य द्यावे. तसेच माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटना यानंतर घडू नयेत, यासाठी पोलिसांनी योग्य आणि कठोर पावले उचलावीत, असेही निवेदन म्हटले आहे. यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा मंजुषा माडजे मगर, उस्मानाबाद तालुका अध्यक्ष सुरेखा जाधव, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष अप्सरा पठाण, ज्योती माळाळे, ललिता पेटे, पवार इत्यादी उपस्थित होत्या.


 
Top