उस्मानाबाद/ प्रतिनिधी

बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यानुसार दुर्बल व वंचित घटकातील बालकांना विनाअनुदानीत व स्वयंअर्थसाहाय्यच्या सर्व शाळांमध्ये 25 टक्के प्रवेशाची ऑनलाईन अर्ज करण्यासाठी दिलेली मुदत दि.21 मार्च-2021 ची वाढवून आता 31 मार्च-2021 अशी करण्यात आली आहे.

 पालकांना कोरोनाचा प्रार्दुभावामुळे वेळेवर अर्ज न भरता आल्यामुळे तसेच काही तांत्रिक अडचणीमुळे वेळेवर अर्ज भरता आलेले नाहीत म्हणून शासनाने ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ दि.31 मार्च-2021 पर्यंत वाढविली आहे. पालकांनी प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज rte25admission.Maharashatra.gov.in या वेबसाईडवर तात्काळ भरावेत.

 यासंदर्भात काही अडचणी आल्यास तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी किंवा जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ.अरविंद मोहरे यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.


 
Top