उस्मानाबाद / प्रतिनिधी :- समाज कल्याण आयुक्त श्री.प्रशांत नारनवरे उस्मानाबादला शासकीय धावती भेटीस आले असता उस्मानाबाद  येथील रमाई आवास योजना यशस्वीपणे राबत असुन निधीच्या कमतरते मुळे बांधकाम लवकर पुर्ण होत नाहीत,सध्या ११७१ इतक्या घरकुलांचे काम चालू असुन निधीच्या कमतरते मुळे अर्धवट असुन लाभार्थी मात्र उघड्यावरती राहत आहेत, तसेच दिड वर्षांपासून ४३५ घरकुल लाभार्थ्यांना प्रशासकीय मान्यता मिळाली असुन त्यांचे बॅंकेत खाते उघडले आहे परंतु अद्यापही त्यांच्या बॅक खातेत अनुदान जमा झाले नाही, आणखी एक हजार प्रस्ताव नगर पालिका कडे पडुन आहेत,यापुर्वी देखिल सहाय्यक आयुक्त उस्मानाबाद यांच्या कडे  पाठपुरावा करीत असुन हा निधी लवकरात लवकर लाभार्थ्यांना वाटप करावा व क.तडवळा येथील महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम आपल्या अधिपत्याखाली लवकरात लवकर पुर्ण करावे अशा मागणीचे निवेदन समाज कल्याणचे आयुक्त प्रशांत नारनवरे  यांना समाज कल्याण विभागातील अधिकारी अ. पवार यांच्या हस्ते देण्यात आले.निवेदन देतांना नगरसेवक तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य सिध्दार्थ बनसोडे, सामाजिक कार्यकर्ते गणेश रानबा वाघमारे, जिल्हा शहर सरचिटणीस काॅग्रेस संजय गजधने, तालुकाध्यक्ष काॅग्रेस सचिन धाकतोडे तसेच समाज कल्याण कर्मचारी कपिल थोरात व इतर उपस्थित होते.

 
Top