उस्मानाबाद / प्रतिनिधी-
उस्मानाबाद तालुक्यातील येवती येथे एका ३८ वर्षीय पुरुषाचा संशायस्पद मृतदेह आढळल्याने परिसरात खून झाला असल्याची चर्चा सुरु आहे. त्यामुळे पोलिस विभागाने श्वान पथकासह घटनास्थळी धाव घेऊन पाहाणी केली.
याबाबत अधीक माहिती अशी की उस्मानाबाद तालुक्यातील येवती येथील येवती दाऊतपूर रसत्यालगत असलेल्या येवाती शिवारात माळी यांच्या शेताजवाळील चारीत चेहऱ्यावर स्वेटर झाकलेल्या अवस्थेत एक प्रेत पडले असल्याची चर्चा येवती गावात वाऱ्यासारखी पसरली.येवती येथील पोलीस पाटिल किशोर पाटिल यांनी घटनास्थळावरुन पाहणी केली असता चेहरा उघडा केल्यावर येवती येथीलच संजय अण्णासाहेब खांडेकर रा. येवती यांचे प्रेत असल्याची खात्री झाल्यावर प्रेताची ओळख पटल्याने सविस्तर माहिती दुरध्वनीवरुन ढोकी पोलीसांना कळवली.तात्काळ घटनास्थळी ढोकी पोलीस ठाण्याचे पोलीस पोहचले.दरम्यान श्वान पथकालाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे. याबाबत ढोकी पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक बुधेवार यांना संपर्क केला असता त्यांनी घटनेचा शोध घेणे सुरु आहे कारवाई करण्याची प्रक्रीया सुरु असल्याचे घटनास्थळवरुन सांगीतले.ढोकी पोलीस ठाण्यात आजून या घटनेची नोंद झालेली नाही परिसरात फक्त खून झाल्याची चर्चा आहे तशी अधीक्रत अद्याप नोंद झालेली नाही .
घटनास्थळाला उस्मानाबादचे अप्पर पोलीस अधीक्षक संदिप पालवे , पोलीस उप विभागीय विशाल खांबे , ढोकी पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक जगताप यांनी भेट दिली घटनास्थळावर मोबाईल फाँरेन्सीक व्हँनने पुरावे गोळा करुन पुढील तपासाठी तपास अधीकाऱ्यांकडे दिले. खून झाला की अन्य कशाने मृत्यू झाला हे पोलीस तपासाअंतीच उघड होईल.