उस्मानाबाद/ प्रतिनिधी

महाॲग्री एफपीओ फेडरेशन द्वारा रविवार दिनांक 14 फेब्रुवारी रोजी उस्मानाबाद येथे एफ.पी.ओ.साठी उद्योजक मा.हनुमंतराव गायकवाड,अध्यक्ष बीव्हीजी ग्रुप यांचे शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी व्यवसायाच्या संधी या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

 यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार  कैलास दादा पाटील,  एफपीओ फेडरेशन प्रदेक्ष  उपाध्यक्ष डॉ.संदीप तांबारे,प्रा.तुषार वाघमारे, बिव्हीजी ग्रुपचे मा.रवी गाडे,श्री संजय शिंदे, जिल्हाध्यक्ष श्री.अशोक लांडगे,श्री.प्रताप देशमुख,श्री.सयाजी शेळके, श्री.रवी शेळके  मान्यवर उपस्थित होते.

  प्रसंगी बोलताना हनुमंतराव गायकवाड यांनी एफपीओ सोबत मिळून काम करत शेतकऱ्याचा शेतीवरील खर्च अर्ध्यावर आणत उत्पन्न व गुणवत्ता यामध्ये वाढ करण्यासाठी बीव्हीजी द्वारा प्रयत्न केले जाणार असल्याचे सांगितले. शिवाय शेतकऱ्यांना लागणारे अत्याधुनिक तंत्रज्ञान बीव्हीजी उपलब्ध करून देणार असून, गुणवत्तापूर्ण  उत्पादन घेण्यासाठी मार्गदर्शनही करणार आहे. सोबतच उत्पादित मालकच्या विक्रीची जबाबदारी बीव्हीजी घेईल असेही सांगितले. आ.कैलास पाटील यांनी शेती व शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी शेतकरी कंपन्यांना सर्वोतोपरी मदत करणार असल्याचे सांगितले.प्रसंगी जिल्ह्यातील विविध शेतकरी कंपन्यांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉक्टर संदीप तांबरे यांनी केले सूत्रसंचालन प्रा.तुषार वाघमारे यांनी तर आभार प्रदर्शन अशोक लांडगे यांनी केले.


 
Top