उस्मानाबाद / प्रतिनिधी

माहिलांनी पुढे  येऊन बचत गटाच्या माध्यमातून उद्योग उभारावेत आणि स्वत:सह कुटुबांला आर्थिक र्स्थेर्य मिळवून द्यावे,असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष अस्मिता कांबळे यांनी नुकतेच केले.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष कळंब पंचायत समिती, अंतर्गत दहिफळ येथे प्रगती महिला ग्राम संघामार्फत नुकतेच घरकुल मार्ट चे उद्घाटन  जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिताताई कांबळे यांच्या हस्ते झाले,यावेळी त्या बोलत होत्या.      

जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष अर्चनाताई पाटील यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. सहाय्यक गट विकास अधिकारी श्री. कुसनेनीवार, जिल्हा अभियान व्यवस्थापक समाधान जोगदंड,जिल्हा समन्वयक गुरुनाथ भांगे कृतीसंगम, दहिफळचे सरपंच श्री.पाटील, ग्रामसेवक  यांच्या उपस्थिीत  करण्यात आले.

उमेद अभियानांर्तगत प्रगती महिला ग्राम संघाच्या मध्यातून नाविन्यपूर्ण उपक्रम करण्यात आला आहे.सर्वासाठी घरे हे केंद्र शासनाचे महत्त्वकांक्षी धोरण आहे.केंद्र पुरस्कृत प्रधान मंत्री आवास योजना (ग्रामीण) आणि राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना,शबरी आवास योजना,पारधीआवास योजना,कोलाम आवास योजना इत्यादी योजना घरकुलासाठी राबविण्यात येतात या योजनाची अमलबजावणी गतिमान आणि गुणवत्तापूर्वक होण्याकरिता राष्ट्रीय आवास दिनाचे औचित्य साधून राज्यामध्ये 20 नोव्हेबर 2020 ते 28 फेब्रुवारी 2021 या शंभर दिवसाच्या कालावधीमध्ये माहाआवास अभियान (ग्रामीण) भागात राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

घरकुल मार्ट अंर्तगत घरकूल लाभार्थींना घर बांधणीसाठीचे सर्व साहित्य एकाच छताखाली उपलब्ध होणार आहे. घरकूल मार्ट सुरु होण्यापूर्वी लाभार्थ्यांना घरकूलाकरिता लागणारे सर्व साहित्य कळंब किंवा येरमाळा येथून आणावे लागत होते. आता लाभार्थी यांना वाहतुकीचा खर्च तसेच वेळ सुधा वाचणार आहे. या घरकूल मार्टचा फायदा दहिफळ ग्रामपंचायत परिसरातील सपनाई,गौर,वाघोली बाभळगाव,परतापूर आणि उपाळई या गावाना होणार आहे.या घरकूल मार्टच्या मध्यातून जवळ जवळ 238 घरकूल लाभार्थ्यांना सर्व साहित्य माफक दारामध्ये चांगल्या गुणवत्तेचे उपलब्ध होणार आसल्यामुळे त्यांना थेट फायदा होणार आहे.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्राम संघाचे अध्यक्ष अंजली ढवळे यांनी केले. तर भाग्यश्री यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला तालुका अभियान व्यवस्थापक सचिन ठोकळ,तालुका व्यवस्थापक आयबी/सीबी तेजस कुलकर्णी, तालुका व्यवस्थापक एमआयएस विलास ताटे,प्रभाग समन्वयक स्नेहल गावंडे,अमोल सालपे व गावातील स्वयंसहाय्यता गटातील महिला उपस्थित होत्या.


 
Top