तुळजापूर / प्रतिनिधी- 

तालुक्यातील नांदुरी येथील ग्रामस्थांनी श्रीराम मंदीर साठी 72762 रुपयाचा निधी सोमवार दि. १५ रोजी  सुपूर्द केला.प्रथमता गावातुन श्रीराम प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. यात महिलांसह रामभक्त ग्रामस्थ मोठ्या संखेने सहभागी झाले होते. नंतर महाआरती करण्यात आली. 

हा निधी सारंग सुर्यवंशी श्रीकांत कावरे यांच्या कडे सपूर्द करण्यात आला .यावेळी हभप प्रल्हाद सरडे,  हभप अनिल राजमाने, हभप रुपेश नागणे,महादेव सरडे, कंठेश्वर मुळे, ज्ञानेश्वर सरडे, प्रशांत नवगिरे, दयानंद राजमाने, दयानंद पाटील अमृत भोकरे, शिवाजी सरडे, रमेश गोंगाणे, संतोष सोनवणे सह ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थितीत होते.

 

 
Top