उमरगा / प्रतिनिधी

शहरातील न्यू बालाजी नगर येथे शुक्रवारी दि.5 रोजी 13 वर्षीय लहान मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,शहरातील न्यू बालाजी नगर येथील रहिवासी अविनाश अंबुरे हे वास्तव्यास असून त्यांचा मुलगा सर्वेश अंबुरे वय-13 हा दुपारी आपल्या आईला खोलीत अभ्यास करायला जातो म्हणून गेला व खूप वेळ बाहेर येत नसल्याने मुलाच्या आईने खोलीत जाऊन पाहिले असता आतून दार बंद असल्याचे दिसून आले. यावेळी शेजाऱ्याच्या मदतीने दार उघडले असता मुलाने खोलीतील पंख्याला  गळफास घेतल्याचे दिसून आले.तातडीने मुलास शहरातील माऊली हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी मुलास मयत घोषित केले.याची खबर विश्वंभर प्रतापराव पाटील यांनी पोलिसांना दिली असता पोलीस निरीक्षक मुकुंद आघाव,सपोनि सिद्धेश्वर गोरे हे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले.मयतास शवविच्छेदन साठी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. रात्री उशिरा सदर प्रकरणी उमरगा पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.शवविच्छेदनांतर रात्री उशिरा मयत मुलावर त्याच्या मूळ गावी उस्मानाबाद येथे अंतिमसंस्कार करण्यात आले.

 
Top