हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या अध्यक्षपदी मंगेश पांगरकर तर सचिवपदी हरी खोटे यांची निवड करण्यात आली. शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त तेर ( ता. उस्मानाबाद ) येथील शिव नृसिंह ग्रुप शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने गुरुवार दि. २१ जानेवारी रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी या बैठकीत नूतन शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली.
यामध्ये समितीच्या अध्यक्षपदी ग्रामपंचायत सदस्य मंगेश पांगरकर , उपाध्यक्षपदी अविनाश इंगळे , सचिवपदी हरी खोटे , खजिनदारपदी वैभव वैरागकर , तर मिरवणूक प्रमुखपदी अक्षय कोळपे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली .यावेळी नूतन कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी धीरज पांगरकर , स्वप्नील इंगळे , सिद्धेश्वर शिराळ , किरण खोटे , धीरज शिराळ , अमोल पांगरकर , श्रीकांत वैराकर , अभिषेक लामतुरे , निखिल पांगरकर , गणेश उटगे , सौरभ इंगळे , अमन कोळपे , किशोर गाढवे , रोहित गाढवे , राहुल गाडे , रोहन इंगळे गजानन मांजरे , सुरज पांगरकर , धीरज माने , वैभव बडवे , अनिकेत शिराळ , राहुल इंगळे , गणेश इंगळे , रोहन गाढवे , रोहन माने , अनिकेत इंगळे , ऋषिकेश वैराकर , हर्षद इंगळे आदींसह शिवप्रेमी नागरिक उपस्थित होते.
