तुळजापूर / प्रतिनिधी -
येथील नगर परिषदेतील अधिकारी -कर्मचारी यांना शिवीगाळ केल्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्याची मागणीसाठी नगर परिषद कर्मचाऱ्यांनी शुक्रवार दि.22पासुन कामबंद आंदोलन,सुरु केले आहे यामुळे नगर परिषदेचे कामकाज ठप्प झाले.
याबाबतीत अधिक माहीती अशी की, विशाल विठ्ठल लोंढे यांस अनुकंपावर नियुक्ती आनुषंगाने घेतलेल्या बैठकीत सोमनाथ कांबळे यांनी मुख्याधिकारी कर्मचारी यांच्यावर निरर्थक आरोप करुन शिवीगाळ केली तसेच विशाल लोंढे पुजा ऐखंडे यांनी अनुकंपावर नियुक्ती न मिळाल्यास आत्महत्या करण्याची धमकी अर्ज देऊन प्रशासनावर दबाब आणण्याचा प्रयत्न करीत आहेत तरी याची नोंद घेवुन गुन्हा दाखल करावा अन्यथा कामबंद आंदोलन करण्याचा इशाऱ्याचे निवेदन नगर परिषद कर्मचारी संघटनेने सर्व लोकप्रतिनिधी जिल्हाधिकारी पोलिस अधीक्षक यांना दिले होते. त्याची दखल न घेतल्याने शुक्रवार पासुन नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरु केल्याने पोलिसांनी या संघटनेच्या पदाधिकारींना बोलवुन घेवुध चर्चा केली.या आंदोलनात नगर परिषदेचे कर्मचारी सहभागी झाले होते.
