माजी मंत्री तानाजीराव सांवत, खा.ओमराजे निंबाळकर, अा.कैलास घाडगे-पाटील यांच्या प्रयत्नातून अर्थमंत्री जयंत पाटील यांची भेट घेऊन दुधाळवाडी साठवण तलाव, रामदरा साठवण तलावापर्यंतच्या प्राधान्य कामास मंजूरी घेतली आहे. २०२० च्या अर्थसंकल्पामध्ये ८०० कोटीची तरतूद करण्यास यश आले होते. तर १५१०.६३ कोटी आवश्यकता असल्याचे सांगण्यात आले होते.त्यामुळे २०२४ पर्यंत कृष्णा-मराठवाडा सिचंन प्रकल्पातील ७ टीएमसी पाणी जिल्हयात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
कृष्णा मराठवाडा प्रकल्पांतर्गत दुधाळवाडी व रामदरा तलावापर्यंतच्या कामाचा प्राधान्यकमात समावेश . उस्मानाबाद जिल्हयासाठी महत्वपूर्ण असणारा कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प हा मंजुर असून सदरील योजनेची कामे चालू होती मात्र पूर्वीच्या भाजप सरकारच्या काळात सदरच्या योजनेचा निधी खर्च करण्यासाठी प्राधान्य कमाची अट असल्यामुळे करोडो रु . निधी खर्चाविना प्रलंबित होता व अखर्चित राहिला . त्यामुळे या योजनेतील कामे थांबली होती . उस्मानाबाद जिल्हयात शेतकरी आत्महत्या सतत वाढत असून सिंचनाचा कुठलाही मोठा प्रकल्प नसल्यामुळे तसेच जिल्हयात सततचा पडणारा दुष्काळ यामुळे ही योजना पूर्ण करण्याचे महत्त्व लक्षात घेवून खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांनी या योजनेचे गांभिर्य लक्षात घेवून लोकप्रतिनिधी झाल्याच्या पहिल्या दिवसापासून या योजनेतील अडीअडचणी समजून ही योजना पूर्ण करण्यासाठी सतत शासनाकडे पाठपुरावा केला व सुरु आहे . हा प्राधान्य कमाचा प्रस्ताव शासनास आमदार कैलास बाळासाहेब घाडगे - पाटील यांच्या दि . 27/04/2020 रोजीच्या पत्रान्वये व खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या 21/08/2020 च्या पत्रान्वये प्रस्ताव शासनाकडे सादर केला. व दि. 24/02/2020 रोजी जयंतजी पाटील यांची भेट घेतली . व दि . 25/02/2020 रोजी उपसचिव श्री . धरणे भेट घेवून या योजनेचे महत्व व अडचणीबदद्ल माहिती दिली . या प्रस्तावास रु . 1510.63 कोटींची आवश्यकता होती .आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्याच 2020 च्या आर्थिक बजेट मध्ये माजी मंत्री डॉ तानाजी राव सावंत ,खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांना रु . 800 कोटीची तरतूद करण्यासाठी यश आले .
दि . 21 जानेवारी रोजी महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दुधाळवाडी साठवण तलावाच्या व रामदरा साठवण तलावापर्यंतचा प्राधान्य कमात काम घेण्यास मंजुरी दिली आहे . व याबाबतचा सविस्तर आदेश लवकरच निर्गमीत होणार आहे . त्यामुळे 2024 पर्यंत या योजनेतील 7 टी.एम.सी. पाणी येण्याचा मार्ग मोकळा झाला असून याचा फायदा जिल्हयातील सर्व तालुक्यांना मिळणार आहे व त्यामुळे 14936 दलघमी व 8973 दलघमी असे एकुण 23909 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे . त्यामुळे जिल्हयातील शेतकन्यांकडून याबद्दल आनंद व कौतुकीचा वर्षाव होत आहे . एकंदरीत भाजपा सरकाने या योजनेतील प्राधान्य कमाची अट रद्द होवून कामे दुधाळवाडी व रामदरी तलावापर्यंतची कामे होण्यास झालेला अडथळा दूर होवून पुढील कामे होण्यास मार्ग मोकळा झाला आहे . या प्रस्तावास मंजुरी मिळाल्यामुळे माजी मंत्री तथा आमदार डॉ तानाजी राव सावंत साहेब, खासदार मा.ना.श्री . ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांच्याकडून मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे , अर्थमंत्री तथा उपमुख्य मंत्री अजित पवार व शिवसेनेचे नेते पर्यटन मंत्री अदित्य ठाकरे व जलसंपदा मंत्री जयंत पाटील व महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांचे आभार व्यक्त केले.
