परंडा / प्रतिनिधी : -
मराठा सेवा संघप्रणीत जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषद महाराष्ट्र उस्मानाबाद जिल्हा यांच्या वतीने जिल्ह्यातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा रविवार दि.१७ रोजी सकाळी ११ वा.परंडा येथील महात्मा गांधी विद्यालय येथे पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येत आहे.जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषद महाराष्ट्र उस्मानाबाद जिल्हा ,मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड यांच्या वतिने सदरील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर राहुल देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर शहाजी चंदनशिवे, जिल्हा उपाध्यक्ष प्रोफेसर डॉक्टर मुकुंद गायकवाड ,जिल्हा कार्याध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर विशाल जाधव ,जिल्हा सचिव प्राध्यापक डॉक्टर नितीन पडवळ, जिल्हा सचिव आदित्य पाटील व जिल्हा कोषाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर श्रीकांत भोसले यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. पुरस्कार प्राप्त महिलांमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले साहित्यरत्न पुरस्कार शिवमती कमलाताई नलवडे, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अध्यापक रत्न पुरस्कार शिवमती डॉक्टर शांता जाधवर (गीते ) ,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले समाज रत्न पुरस्कार शिवमती विद्या महेश निंबाळकर तर राजमाता जिजाऊ उद्योजक रत्न पुरस्कार शिवमती किरण ताई देशमाने व राजमाता जिजाऊ प्रशासकीय सेवा रत्न पुरस्कार शिवमती शितल लेकुरवाळे यांना जाहीर झाले आहेत .या पुरस्कार प्राप्त महिलांना शिवमती डॉक्टर निर्मलाताई पाटील राष्ट्रीय अध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड तथा प्रदेशाध्यक्षा जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषद महाराष्ट्र, शिव श्री बालाजी जाधव प्रदेश सचिव जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषद महाराष्ट्र ,शिवश्री नवनाथ जाधव मराठवाडा विभागीय अध्यक्ष, जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषद महाराष्ट्र ,शिवश्री तुषार पाटील जिल्हा अध्यक्ष मराठा सेवा संघ उस्मानाबाद, शिवश्री तानाजी चौधरी जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड उस्मानाबाद ,शिवमती किरण निंबाळकर जिल्हाध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड उस्मानाबाद यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सन्मानित करण्यात येत आहे.सदरील कार्यक्रमास मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड ,जिजाऊ ब्रिगेड परांडा यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले आहे .असे जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर राहुल देशमुख यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
