उस्मानाबाद/ प्रतिनिधी
-विभागीय आयुक्त,येथील ग्रापपंचायत सार्वत्रिक निवडणूक-2020 साठी निवडणूक निरिक्षक म्हणून अंबाजोगाई येथील उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) श्रीमती निलम बाफना यांची नियुक्ती केली आहे.निवडणूक निरिक्षक हे नामनिर्देशन पत्राची छाननी दि.31 डिसेंबर-2020,चिन्ह वाटप.दि.04 जानेवारी-2021 मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांच्या दुसरे प्रशिक्षण दि.09 जानेवारी-2021, प्रचार कालावधीत मतदानाच्या दिवसा अगोदरच्या 7 दिवसांमध्ये कोणत्याही एका दिवशी, मतदानाचा दिवस दि.15 जानेवारी-2021,आणि मतमोजणी दि.18 जानेवारी-2021 रोजी वाशी तालुक्यात भेट देणार आहेत.असे तहसीलदार वाशी यांनी कळविले आहे.
