उस्मानाबाद / प्रतिनिधी-

तालुक्यातील सारोळा (बुद्रूक) येथे टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेतील विजेत्या संघाचा शनिवारी (दि.१६) ट्रॉफी व पारितोषिक देवून सत्कार करण्यात आला.

सारोळा येथे टायगर ग्रुपच्या वतीने २१ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धा भरविण्यात आली होती. या स्पर्धेत ड्रीम इलेव्हन (सारोळा) प्रथम, टायगर बॉईस (सारोळा) द्वितीय तर बरमगाव संघास तृतीय पारितोषिक देण्यात आले. ट्राफी व रोख रक्कम असे पारितोषिकाचे स्वरूप होते. तर आशिष देडे (मॅन ऑफ द मॅच), नरेंद्र मंडीवाळ (मॅन ऑफ द सिरीज), देवानंद आगाशे (उत्कृष्ट षटकार) तर आसिफ सय्यद याचा उत्कृष्ट गोलंदाज ठरल्याबद्दल ग्रामपंचायत सदस्य विनोद बाकले, युवा नेते अजय पाटील व मिया सय्यद यांच्या हस्ते पारितोषिक देवून सत्कार करण्यात आला. यावेळी विशाल बाकले, सौरभ गुरव, सार्थक जगदाळे, अमित कुदळे, श्रेयश देवगिरे, आदित्य शिंदे, रियाज सय्यद, पंकज गाढवे, पृथ्वीराज गाढवे, असिफ सय्यद, महादेव कोल्हे, इरफान शेख, रोहित झोंबाडे, ओंकार सुरवसे, सुदेश शितोळे, सोपान टिंगरे, नागेश ईसाके,आदित्य लिंगे, अजय कोळगे, ओंकार बाकले, काका गाडे, देवानंद आगाशे, नरेंद्र मंडीवाळ, अभी कुदळे, आशिष देडे आदींसह खेळाडू उपस्थित होते.

 
Top