उस्मानाबाद/ प्रतिनिधी

ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादूल मुस्लिमीन (एआयएमआयएम) उस्मानाबाद शहर शाखेच्या वतीने 72 व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त दि.26 जानेवारी 2021 रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास मोठा प्रतिसाद मिळाला.

 शहरातील ख्वाजानगर येथे आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात परिसरातील नागरिक व युवकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन रक्तदान केले. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शिबिराला भेट देऊन आयोजकांचे कौतुक केले. दिवसभरात 70 जणांनी रक्तदान केले. रक्तदान करणार्‍या सहभागींना एआयएमआयएमच्या पदाधिकार्‍यांनी प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले. 

 या शिबिरास एआयएमआयएम विद्यार्थी विभागाचे शहराध्यक्ष आवेज अलिम शेख, शहराध्यक्ष अजहर मुख्तार सय्यद, युवा शहराध्यक्ष अल्फाज सरफराज शेख, इम्तियाज (भाई) बागवान, जमीर खान, अंजुमम हेल्थकेअर  सोसायटीचे अध्यक्ष फिरोज (भाई) पल्ला, अजहर मुजावर, उद्योजक गफारभाई शेख, वसीम शेख, हाफिज अलीम शेख, जफर शेख, यांच्यासह शहरातील एआयएमआयएमचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

 
Top