उस्मानाबाद तालुक्यातील तेरचा युनोस्कोमध्ये समावेश करण्यासाठी तेरचा विकास ब्रहत आराखडा तयार करण्यासाठी विविध वास्तुविशारदाने तेरला विविध ठिकाणी भेटी देऊन निरीक्षण केले.
तेरचा ब्रहत विकास आराखडा तयार करून तेरचा युनेस्को मध्ये समावेश करण्यासाठी प्रयत्न करणे यासाठी संचालक पुरातत्व संचालनालय व तेरणा चारीटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने ब्रदर आराखडा तयार करण्यात येणार असून त्यादृष्टीने कोल्हापूर ,नाशिक, पुणे, अंधेरी येथील वास्तुविशारद यांनी येथील चैत्यगृह, विटांनी बांधलेले तिर्थकुंड, बैरागी टेकडी, कोट टेकडी, नरसिंह मंदिर ,त्रिविक्रम मंदिर येथे भेटी देऊन पाहणी केली.या विविध विशारदापैकी एकाची निवड तेर ब्रहत आराखडा तयार करण्यासाठी करण्यात येणार आहे .या विशारदांचाव खर्च तेरणा चारीटेबल ट्रस्ट करणार असून आ. राणाजगजितसिंह पाटील यांची ही संकल्पना आहे.
तेरचा ब्रहत आराखडा तयार करण्यासाठी रेवणसिद्ध लामतुरे, दिपक खरात, तेरचे सरपंच नवनाथ नाईकवाडी, ग्रामविकास अधिकारी प्रशांत नाईकवाडी, तेरणा चारीटेबल ट्रस्टचे प्रतिनिधी म्हणून बाळकृष्ण लामतुरे ,पुरातत्व व संचालनालयाचे प्रतिनिधी म्हणून अमोल गोटे यांची कमिटी करण्यात आली असून तेरचा युनेस्कोमध्ये समावेश झाल्यावर जगातील मोठ्या प्रमाणावर पर्यटक ,अभ्यासक यांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे तेरच्या विकासालाही वेग येणार आहे.
