तालुक्यातील बहुचर्चित असलेल्या जळकोट येथील ग्रामपंचायतवरील वीस वर्षाची सत्ता काँग्रेस राष्ट्रवादीकाँग्रेस शिवसेना मनसे प्रणित बहुजन महाविकासआघाडी ने उलथवली . बहुजन महाविकास आघाडी पॅनेलने विजय मिळवताच जळकोट येथे जेसीबीने गुलाल उधळुन काँग्रेस राष्ट्रवादीकाँग्रेस शिवसेना मनसे कार्यकत्यांनी एकच जल्लोष केला.
या विजयाचे शिल्पकार ठरले ते पँनल,प्रमुख काँग्रेसचे अशोक पाटील, जि.प.सदस्य प्रकाश चव्हाण, मनसेचे प्रशांत नवगिरे सेनेचे कृष्णात मोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे महेश कदम तसेच गजेंद्र पाटील यशवंत पाटील यांनी सत्ता उलथवली.
येथील जिल्हा परिषद व ग्रामपंचायत वर वीस वर्षापासून माजीजिपसदस्य गणेश सोनटकेची सत्ता होती माञ मागील जिपपंस निवडणुकीत काँग्रेसचे विद्यामान जि.प सदस्य प्रकाश चव्हाण यांनी या जिप मतदार संघात विजय मिळवून ताबा घेतला नंतर ग्रामपंचायत निवडणुक लागली यात काँग्रेस राष्ट्रवादी -काँग्रेस - शिवसेना -मनसे यांनी एकञित येवुन बहुजन महाविकास आघाडी स्थापन करुन विजय मिळवून सोनटक्केचे वर्चस्व संपुष्टात आणले.
