शाकंभरी नवराञोत्सव व सलग आलेल्या सुट्यांचा पार्श्वभूमीवर रविवार दि२४ तिर्थक्षेञ तुळजापूरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती.आज शाकंभरी नवराञोत्सवाचा चौथ्था माळेदिवशी देविंजींचा सिंहासनावर मुरली अलंकार महापुजा मांडण्यात आली होती.
सकाळी देविजींना पंचामृत शुध्द स्नान घातल्यानंतर शाकंभरी नवराञोत्सवातील सिंहासन महापुजासंपन्न झाल्या नंतर वस्ञोलंकार घालण्यात आले. नंतर देविजींचा सिंहासनावर मुरली अलंकार महापुजा मांडण्यात आली
रविवारी पहाटे पासुनच भाविकांनी श्रीतुळजाभवानी दर्शनार्थ गर्दी केली होती.सकाळी मोफत दर्शन पासेस संपल्यानंतर श्रीमंत भाविकांनी प्रतिभाविकतीनशे रुपये पेडदर्शन पास घेवुन देवीदर्शन केले तर गोरगरीब वारकरी भाविकांनी माञ राजमाता जिजाऊ महाध्दार मधुन दर्शन घेतले पेडदर्शन पासेस काऊंटर दिवस भर सुरु होते दुपारी पेडदर्शन पास वाल्यांना देवीदर्शन घेण्यासाठी दोन तासाचा वर लागत होते तर मोफत दर्शन पासेस संपल्याने दर्शन मंडप भाविका विना दुपारी सुना होता तिर्थक्षेञ पंढरपूर येथील पुञदा ऐकादशी दिनी विठुरायचे दर्शन घेतलेला वारकरी दुपारी तुळजापूर आला त्यांनी ही महाध्दार मधुन हात जोडुन बाहेरुन दर्शन घेतले.