तुळजापूर / प्रतिनिधी-
श्रीप्रभु रामचंद्राचे भव्य मंदीर अयोध्यात उभारले जात असुन यात आपला खारीचा वाटा असावा व हे मंदिर फक्त राममंदिर न राहता “राष्ट्रमंदिर” व्हावे याहेतुन तिर्थक्षेञ तुळजापूर येथे सुरु करण्यात आलेल्या निधी संकलन अभियानास तुळजापूर वासिय भरभरुन प्रतिसाद देत आहेत.
या अभियानाचा आरंभ महाराष्ट्राचीकुलस्वामीनी श्रीतुळजाभवानी मंदीरा पासुन करण्यात आली. श्री राम भक्तांनी सर्वजातीधर्माचा अगदी मुस्लीम बांधवाचाही यात ऐपती प्रमाणे निधी दिला सध्या घरात भेट देऊन राम मंदिराच्या उभारणीची माहिती देऊन निधी देण्याबाबत आवाहन केले प्रत्येक घरा मध्ये लोकांनी उस्फुर्त पणे निधी देत आहेत.
मंहत तुकोजीबुवा मंहत मावजीनाथ बुवा मंहत श्री दत्तअरण्य महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या रामभक्त घरोघरी जावुन यथाशक्ति निधी घेवुन निधी संकलन सुरु असुन यात पारदर्शकतापणा असुन संपूर्ण जमा झाल्यानंतर निधी अयोध्या न्यास कडे पाठवण्यात येणार आहे. या निधीतुन राममंदीर बरोबरच धर्मादाय रुग्णालय शाळा सह अन्य समाजपयोगी उपक्रम साठी याचा वापर केला जाणार आहे.
या निधी संकलन साठी मंहत मावजीनाथ मंहत श्रीदत्तअरण्य महाराज यांच्या नेतृत्वाखाली समिती प्रमुखअण्णा चव्हाण, जगदिश पलंगे, इंद्रजित साळुंके, नागेशनाईक ,शिवाजी बोधले, आण्णासाहेब क्षिरसागर,धन्यकुमार मस्के,जीवन अम्रुतराव,विवेक गंगणे,शशिकांत परमेश्वर, अण्णा चव्हाण, सचिन भांजी, बाळासाहेब पेंदे, सागर पारडे, सागर कदम सह त्याची सहकारी मंडळी परिश्रम घेत आहेत.