उस्मानाबाद/ प्रतिनिधी

येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात २६जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या ऊत्साहात साजरा करण्यात आला.सकाळी ७.५० वाजता ध्यजारोहण प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख यांचे हस्ते झाले.

 याप्रसंगी महाविद्यालयातील एन.सी.सी.च्या केंडेट्सनी लक्षवेधी संचालन करून उपस्धितांची मने जिंकली.दि.१२ ते १९ जानेवारी २१ दरम्यान संपन्न झालेल्या शाखास्तरीय श्री स्वामी विवेकानंद सप्ताहातील, शिक्षणमहर्षी डाॅ.बापूजी साळुंखे निबंध,वक्तृत्व,चिञकला स्पर्धा महाविद्यालयीन व ज्यु.काॅलेज गटात घेण्यात आल्या होत्या प्रत्येक स्पर्धेत बक्षीसपाञ ठरलेल्या विजेत्या स्पर्धकांना  प्रथम,द्वितीय,तृतीय विजेता ठरलेल्या अनुक्रमे २०१,१५१,१०१रूपये व प्रमाणपञ महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख ,प्राचार्या डाॅ.सुलभा देशमुख (श्रीमती सुशिलादेवी साळुंखे काॅलेज आॅफ एज्युकेशन) प्र.प्राचार्य डाॅ.कठारी (शिक्षणमहर्षी डाॅ.बापूजी साळुंखे विधी महाविद्यालय) प्र.प्राचार्य श्री.पवार (अद्यापक विद्यालय,उस्मानाबाद)यांचे हस्ते पारितोषिक वितरण समारंभात देण्यात आली.तसेच दि.१७जानेवारी रोजी,श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मा.प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांचा जन्म दिन “ज्ञान शिदोरी दिन”म्हणून साजरा करतांना शिक्षकाकडून १००पुस्तके भेट स्वरूपात जमली होती ती   या समारंभात गरिब विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आली व कोरोना काळात उस्मानाबाद शहरातील कांही युवकांनी चांगले काम केले होते त्यांना कोरोना योध्दे म्हणून जयसिंगराव देशमुख यांचे हस्ते गौरवण्यात आले.

यावेळी उपप्राचार्य प्रा.बबन सूर्यवंशी,प्रा.डाॅ.ए.बी.इंदलकर,प्रा.श्रीराम नागरगोजे,प्रा.राजा जगताप,प्रा.वैभव आगळे उपस्थित होते.कार्यक्रमाला ग्रंथालयाचे नागा देशमुख,सोमनाथ,बशीर यांनी सहकार्य केले.सूञसंचालन डाॅ.केशव क्षीरसागर यांनी केले आभार प्राचार्या डाॅ.सुलभा देशमुख यांनी मानले.यावेळी रामकृष्ण महाविद्यालयाच्या परिसरातील चारही शाखेतील गुरूदेव कार्यकर्ते,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top