उस्मानाबाद / प्रतिनिधी- येथे पिताश्री श्रीमंतराव रणदिवे प्रतिष्ठानच्या वतीने श्री दत्तगुरू जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला़ दरम्यान, टाळमृंदगाच्या गजरात, श्री दिगंबरा, दिगंबरा़ या जयघोषात निघालेल्या भव्य गुरूचरित्र दिंडीने अवघी श्री दत्तगुरू नगरी दुमदुमली होती़
शहरातील श्री दत्तगुरू नगरीत पत्रकार धनंजय रणदिवे यांच्या श्री दत्तगुरू निवासस्थानी मागील ५ वर्षांपासून श्री गुरुदेव दत्तात्रेय महाराज यांचा जन्मोत्सव साजरा करण्यात येतो़त्यानुसार यावर्षीही बुधवारपासून (दि़ २३) सप्ताह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते़ दररोज नित्योपचार महापूजा, गुरुचरित्र पारायण तर मंगळवारी श्री दत्तगुरु महाराजांचा जन्मोत्सव सोहळा मोठ्या भक्तीमय वातावरणात संपन्न झाला़ सकाळी श्री दत्तुगरूंची मुर्ती व चरण पादुकांस महाअभिषेक घालून विधिवत पूजन करण्यात आले़ पुजेचे पौरोहित्य श्रीहरी कुलकर्णी यांनी केले़ त्यानंतर भव्य गुरूचरित्र ग्रंथदिंडी काढण्यात आली़ टाळ मृदंगाचा गजर आणि दिगंबरा, दिगंबरा़़ असा जयघोष करीत दिंडीत सहभागी झालेल्या मेडसिंगा येथील संत रावसाहेब (बाबा) पाटील वारकरी शिक्षण संस्थेच्या बालवारकºयांनी उत्कृष्ट सादरीकरण करून उपस्थितांचे लक्ष वेधले़ त्यानंतर शहरातील शांतीनिकेतन कॉलनीतील श्री संत जनाबाई भजनी मंडळाची भजन सेवा झाली़ हभप ज्ञानेश्वर माऊली महाराज मेडसिंगा यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री दत्त जन्मोत्सव सोहळा पार पडला़ त्यानंतर महाप्रसाद वाटपाने सप्ताह सोहळ्याची सांगता करण्यात आली़ यावेळी पत्रकार धनंजय रणदिवे, अंजलीदेवी रणदिवे यांच्यासह परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते़