उस्मानाबाद /  प्रतिनिधी- 

 महिलांनी शहरी भागांमध्ये वेगवेगळ्या फायनान्सकडून गरजेपोटी वैयक्तिक कर्ज घेतले आहे. परंतु ते फेडण्याची सध्याची परिस्थिती नसल्यामुळे सर्व महिला कर्ज फेडू शकत नाही किंवा कर्जाचे हप्ते भरू शकत नाहीत. याचा विचार करून सर्व  फायनान्स  व बँकेकडून घेतलेले कर्ज माफ करण्याची मागणी बचत गटामार्फत केली जात आहे. या संदर्भात कळंब येथील उपविभागीय अधिकऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. 

 बँकेचे वैयक्तिक कर्ज, बचत गटाचे  कर्ज  माफ करण्यात यावे  त्यामुळे   कर्जाच्या व्यापातून मुक्त होता येईल व आमचे जीवन पुन्हा सुरळीत होईल आमच्या  मागण्या मान्य न झाल्यास आम्हा सर्व महिलांच्या वतीने आपल्या कार्यालयासमोर  उपोषण व  तिव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराच  नारी शक्ती महिला मंडळ व सर्व बचत गट कळंब जिल्हा उस्मानाबाद  यांच्याद्वारे निवेदनाच्या माध्यमातुन देण्यात आला आहे.  निवेदनावर  ज्योती  सपाटे, शैला चोंदे,  शितल  गायकवाड,  सुलभा  गायकवाड, शारदा  बचुटे, प्रेमा  धिमधिमे, इंदुबाई  तनपुरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

 
Top