तेर / प्रतिनिधी 

तेर येथील संत गोरोबा काकांच्या निवासस्थान बांधकामाची चौकशी करून सात दिवसात अहवाल कागदपञाच्या पुराव्यासह सादर करण्याचे आदेश पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक यांना जिल्हाधिकारी दिले आहेत.

तेर येथील संत गोरोबा काकांचा वाडा महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभागाअंतर्गत राज्य स्मारक म्हणून घोषीत करण्यात आला आहे.घराच्या वास्तुची उभारणी करण्यासाठी सन 2009-10 मध्ये एकदा आणि याच वास्तुच्या दुरूस्तीसह सरंक्षण तटभिंत व दगडी फरशी याकरीता सन 2014 -15 मध्ये दुस-यांदा असा एकूण दोन वेळा सुमारे एक कोटीहून अधिक खर्च करण्यात आला आहे.तरीही गोरोबा काकाचे हे घर पावसाळयात गळते आहे.त्यास अनेक ठीकाणी भेगा पडलेल्या आहेत.माळवदाच्या स्वरूपातील असणा-या या वाडयातील लाकडी सर व खांबाना वाळवी लागली आहे.अनेक ठीकाणी ते किडले आहेत.शिवाय मुळची आपली जागाही ते खांब सोडत आहेत.आता तर त्यातील एक सर कोसळला आहे.व दुसरा कोसळण्याच्या मार्गावर आहे.

या अनुशंगाने आपण या बाधंकामाची सखोल चौकशी करून अयोग्य काम करणा-यावरती कार्यवाही करावी .याशिवाय वास्तुच्या सद्यस्थीतीचा आढावा घेऊन पुढील किमान 100 वर्ष ग्रहीत धरता सदरील घराची दुरूस्ती अऩ्यथा आवश्यकता वाटल्यास नव्याने वास्तु उभारणी करण्याचा द्रष्टीने योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी ह.भ.प.दिपक महाराज खरात,ह.भ.प.रघुनंदन महाराज पूजारी व भाविकानी जिल्हाधिकारी यांच्याकडे 5 नोव्हेबरला निवेदनाव्दारे केली होती.याची दखल घेऊन जिल्हाधिकारी यानी पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक यांना चौकशी करून सात दिवसात अहवाल सादर करण्याच्या सुचना करून नमुद मुद्याच्या अनुशंगाने आपला लेखी अहवाल त्यासोबतच्या आवश्यक कागदपञाच्या पुराव्यासह सात दिवसाच्या आत सादर करण्याचे आदेश दिले.

 
Top