उस्मानाबाद/ प्रतिनिधी

शासकीय आयुर्वेद महाविद्यालय,उस्मानाबाद यांच्या वृक्कविकार नियतकालीकेचे (मॅगझीनचे) विमोचन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाले. या मॅगझीनमध्ये  2019-2020 सत्रासाठी झालेले सादरीकरण प्रकाशीत करण्यात आले असून महाविद्यालयातील 18 विभागांनी सादरीकरण केलेले आहे. यामध्ये वृक्कविकाराचे निष्णत वैद्य निर्माण करण्यासाठी मार्गदर्शन केलेले आहे.

 या प्रसंगी अधिष्ठाता डॉ. प्रकाश खापर्डे यांनी वृक्कविकार नियतकालीकेच्या प्रती जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर व उपजिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे यांना भेट दिल्या.या विमोचन प्रसंगी डॉ.कादरी,डॉ.पाटील डॉ.सावंत,व डॉ.लिलके उपस्थित होते

 
Top