वाशी / प्रतिनिधी
वाशी तालुक्यातील पारगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी हे वारंवार गैरहजर राहत असल्यामुळे शिवसेनेचे उप तालुका प्रमुख विकास तळेकर व शिवसैनिकांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बदलीसाठी प्राथमिकआरोग्य केंद्राला टाळे ठोकले.
पारगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सोनवणे हे वारंवार गैरहजर असल्यामुळे येथे येणाऱ्या रुग्णाची गैरसोय होत आहे. त्यामुळे प्रथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. सोनवणे यांची परगाव येथुन तात्काळ बदली करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.पारगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला टाळे ठोकताना शिवसेनेचे उप तालुका प्रमुख विकास तळेकर, युवा सेना उप तालुका प्रमुख स्वप्नील कोकाटे, राजा कोळी, किशोर आखाडे, महेश गिराम, यांच्या सह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व रुग्ण उपस्थीत होते.
