सास्तुर येथील १० वर्षीय मुलीवरती बलात्कार करणाऱ्या आरोपीस फाशीची शिक्षा देण्यात यावी यासाठी दि ५ नोव्हेबर रोजी आक्रोश मोर्चा काढ्यात येणार आहे आसे वंचित बहुजन आघाडी च्या वतिने मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना तहसिलदार यांच्या मार्फत निवेदन दिले आहे.
दिलेल्या निवेदनात आसे नमुद करण्यात आले आहे की,लोहारा तालुक्यातील सास्तुर येथील एका १० वर्षीय मुलीवरती चार नराधमानी बलात्कार केल्याने त्या मुलीची तबीयत अत्यंतगभिर आवस्थेत आहे. चार जनानी बलात्कार केला आहे मात्र फक्त तिन आरोपीला अटक करण्यात आले आहे तर एका आरोपीला सोडुन देण्यात आले आहे आसे निंदनीय कृत्य पोलिसप्रशासनाने केले आहे आसे मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनात म्हणटले आहे. फुले शाहु आंबेडकर यांच्या कर्मभुमीत आशा घटना घडत आहेत .हा महाराष्ट्र पुरोगामी राहीला आहे , जिजाऊ,सावित्री अहिल्याबाई होळकर यांचा विचार घेउन महिला प्रगतिकडे एक पाउल टाकत आहेत .मात्र गेल्या एक वर्षापासुन लहानमुली,व महिलावरती मोठ्या प्रमाणात बलात्कार आत्याचारच्या घटना होत आहेत.
मौजे सास्तुर येथील बलात्कार प्रकरणातील चारही आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी या साठी व पिडीत मुलीच्या घरच्याना संरक्षण देण्यात यावे ,आरोपीला लवकरात लवकर फाशी देउन पिडीत मुलीला न्याय मिळावा या साठी वंचित बहुजन आघाडी उमरगा लोहारा तालुक्याच्या वतिने दि. ५ नोव्हेबर रोजी सकाळी ११ वाजता हुतात्मा स्मारक ते तहसिल कार्यालय पर्यत महिला आत्याचार विरोधात आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आसल्याचे निवेदन मुख्यमंत्री यांना तहसिलदार मार्फत देण्यात आले .
या वेळी वंचित बहुजन आघाडी जिल्हा प्रवक्ता राम गायकवाड ,तालुका अध्यक्ष बाबुराव गायकवाड ,जिल्हा कोषाध्यक्ष चद्रकांत जोगी ,जिल्हासदस्य शिवाजी गावडे बुवा ,जिल्हासल्लागार बालाजी परताळे,कृष्णा जमादार जिल्हासदस्य नेताजी गायकवाड,राघवेंद्र गावडे,उमाजी गायकवाड,दगडु भोसले,गौतम डिग्गीकर,आनंद कांबळे,अदिजन उपस्थित होते.
