उस्मानाबाद / प्रतिनिधी-

जिल्ह्यातील एका उपजिल्हाधिकाऱ्यासह दोन तहसीलदार अशा एकूण तीन महसूल अधिकाऱ्यांच्या नुकत्याच विभागांतर्गत विनंती बदल्या करण्यात आल्या आहेत. या बदली प्रक्रियेतून दोन अधिकारी नव्याने जिल्ह्यात दाखल झाले आहेत.

उस्मानाबादचे निवासी उपजिल्हाधिकारी पद मागील महिनाभरापासून प्रभारी अधिकाऱ्यांकडे होते. या ठिकाणी आता भोकरदन येथील उपविभागीय अधिकारी शिवकुमार स्वामी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच उस्मानाबादचे उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे यांची औरंगाबाद येथे उपविभागीय अधिकारी म्हणून बदली झाल्याने उस्मानाबादचे पद रीक्त आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील भूम येथील तहसीलदार उषाकिरण शृंगारे यांची शिरूर अनंतपाळ येथे तर लोहाराचे तहसीलदार विजय अवधाने यांची नांदेडला महसूल सहाय्यक म्हणून बदली झाली आहे. त्यामुळे या दोन ठिकाणी सध्या प्रभारीराज आहे. तर या बदली प्रक्रीयेतून हिमायतनगर येथील तहसीलदार नरसिंग जाधव हे वाशीचे तहसीलदार म्हणून नियुक्त झाले आहेत. उर्वरीत पदावरही नियुक्त्यांची गरज आहे.

 
Top