कळंब ( शिवप्रसाद बियाणी ) 

नॅचरल शुगर्स चे श्री. बी. बी. ठोंबरे यांना रोटरीच्या वतीने दिला जाणारा कळंब भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला. 

कळंब येथे ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या न्यायाने रोटरी क्लब कळंब सिटी कृतिशील सामाजिक उपक्रमाद्वारे सामाजिक ऋण फेडण्यासाठी सतत कार्यशील असते. याच अनुषंगाने गतवर्षीपासून कळंब शहर व तालुक्याचा उल्लेखनीय कामगिरी करून नावलौकिक केलेल्या व्यक्तिमत्वांचा कळंब भुषण हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येत आहे. 

 या वर्षीचा कळंब भूषण हा पुरस्कार नॅचरल उद्योग समूहाच्या माध्यमातून कृषी, शैक्षणिक, सामाजिक, अशा अनेक क्षेत्रांमध्ये  गौरवास्पद कामगिरी करत कळंब तालुक्याचे नाव राज्यभरच नाही तर देशभर घेऊन गेलेले श्री. बी. बी. ठोंबरे साहेब यांना प्रदान करण्यात येणार आहे असे रोटरी क्लबचे अध्यक्ष रोटे. डॉ. गिरीष कुलकर्णी यांनी जाहीर केले आहे. त्यांच्या निवडीचे पत्र त्यांना देण्यात आले. यावेळी रोटरी क्लबचे सचिव रोटे.डॉ. सचिन पवार रोटे. संजय देवडा, रोटे. लक्ष्मीचंद कस्तुरकर, रोटे. हर्षद अंबुरे, रोटे. अरविंद शिंदे उपस्थित होते.


 
Top