उस्मानाबाद / प्रतिनिधी
उस्मानाबाद शहरातील उंबरे कोठा येथील रहिवासी दगडोबा आंबादासराव उंबरे ( वय 87) यांचे शनिवारी दि, 17 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 8 वाजता हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले, त्यांच्या पार्थिवावर शनिवारी रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले, त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, दोन मुली, सुना, दोन बहिणी, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे,
दगडोबा उंबरे हे अण्णा या टोपण नावाने परिचित होते, उंबरे कोठा परिसर नगर परिषद हद्दीत नव्हता त्यावेळी त्यांनी दारात पाण्याची टाकी बांधून शेतातील पाणी उंबरे कोठा परिसरात उपलब्ध करून देण्याचे पुण्याचे काम केलेले आहे,