तुळजापूर / प्रतिनिधी-
तिर्थक्षेञ तुळजापूर येथे शुक्रवार झालेल्या मराठा क्रांती मोर्चात सहभागी झाल्यानंतर खा. छञपती संभाजी राजे यांनी कोरोना पार्श्वभूमीवर मंदीर भाविकांनसाठी बंद असल्याने राजमाता जिजाऊ महाद्वाराच्या पाहिल्या पायरीवर देविची खणानारळाने ओटी भरुन नतमस्तक होवुन देवी दर्शन घेतले व देवीदर्शना नंतर मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण मिळू दे असे नतमस्तक होवुन साकडे घातले.
