वाशी / प्रतिनिधी- 

वाशी तहसीलचे कर्तव्यदक्ष तहसीलदार डॉ.संदीप राजपुरे यांची नुकतीच हिंगोली  जिल्ह्यामध्ये  मध्ये बदली झालेली आहे. या निमित्त वाशी तहसील कार्यालयातील सभागृहांमध्ये  तहसीलदार डॉ.संदीप राजपुरे यांचा सहकुटुंब सर्व कर्मचाऱ्याचे वतीने सत्कार करण्यात आला. तहसीलदार डॉ.संदीप राजपुरे हे मागील तीन वर्षापासून वाशी तहसील मध्ये कार्यरत होते. तीन वर्षांमध्ये वाशी तालुक्यामध्ये कुठल्याही प्रकारचे भेद भाव न करता अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांनी काम केलेले आहे .कोरोना काळामध्ये संपूर्ण तालुक्यांमध्ये चांगल्या पद्धतीचे नियोजन करून कोरोणा रुग्णांची संख्या वाढू नये यासाठी चांगल्या प्रकारे नियोजन केले होते.त्यांच्या बदलीमुळे कार्यालयात भावनिक वातावरण होते.

यावेळी नायब तहसीलदार भालचंद्र यादव,नायब तहसीलदार सुजाता हंकारे ,नायब तहसीलदार स्नेहलता पाटील तालुका कृषी अधिकारी संतोष कोयले यांच्यासह सर्व विभागाचे शासकीय कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विरभद्र स्वामी यांनी केले तर आभार प्रदर्शन  मुस्तफा हाडोळतीकर यांनी केले .


 
Top