उस्मानाबाद / प्रतिनिधी-  

येथील ज्येष्ठ विधिज्ञ व्यंकटराव महादेवराव गुंड -पाडोळीकर  (६३) यांचे सोलापूर येथे अल्प अजारामुळे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. 

गेल्या कांही दिवसापासून अॅड. गुंड अजारी असल्यामुळे त्यांच्यावर सोलापूर येथील खासगी रूग्णालयात उपचार चालू होते. परंतू त्यांचे आज दि. ५ ऑक्टोबर रोजी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सोलापूर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अनेक विधिज्ञ उपस्थित होते.

 
Top