उस्मानाबाद / प्रतिनिधी-
गोविंदराव तुकाराम देशमुख, (84), रा.मांडवा,ता.वाशी,जि. उस्मानाबाद, यांचे अल्पशा आजाराने रविवारी रात्री 10 वाजेच्या दरम्यान उस्मानाबादेत निधन. देशमुख हे वारकरी संप्रदायात सक्रिय होते.
त्यांच्या पार्थिवावर सोमवारी सकाळी उस्मानाबाद शहरातील कपिलधार स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, 3 मुले,1 मुलगी,सुना, नातवंडे,असा परिवार आहे.
दिव्य मराठीचे ब्युरो चीफ तथा उस्मानाबाद जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रसेन देशमुख यांचे ते वडील होत.