तुळजापूर / प्रतिनिधी-
तालुक्यातील निलेगांव येथील कुरणे यांच्या मालकीच्या जमीन गट नं. 351 मध्ये अंत्यविधी करण्यास प्रतिबंध करण्याची मागणी निलेगांव येथील ग्रामस्थांनी केली आहे.
तहसिलदार, यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, निलेगांव येथील हमीद गिनान कुरणे यांच्या मालकी व कब्जेवहिवाटीच्या जमीन गट नं. 351 असून सदरची जमीन ही हमीद यांनी सुपीक बनवली आहे, त्या जमीनीच्या उत्पन्नातुन त्यांची व त्यांच्या कुटूंबियांची उपजिवीका भागते. परंतु सदर जमीन गट नं. 351 मध्ये निलेगांव येथे बेकायदेशीररित्या अंत्यविधी करतात.
सदर जमीन गट नं. 351 मधील स्मशानभूमीलगत महात्मा गांधी विद्यालय तसेच भरपूर घरे आहेत. निलेगांव येथे जमीन गट नं. 32 / 33 मध्ये शासनामार्फत निलेगाव येथील लोकांना अंत्यविधी करण्यासाठी नियोजीत जागा बांधून देण्यात आली आहे. तरी गावातील कांही गुंड प्रवृत्तीचे लोक हे दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याच्या व्देष भावनेने जाणुन-बुजून गरीब शेतकऱ्यास त्रास देण्याचा प्रयत्न करीत आहेत. तरी जमीन गट नं. 351 मध्ये स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यास प्रतिबंध करण्याची मागणी निलेगांव येथील ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली. निवेदनावर हमीद कुरणे, दगडू कोळी, कल्लप्पा मुळे, नागनाथ सुतार, हबीब डोंगरे, अखेलाबी कुरणे, रजियाबी कुरणे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.