उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 महात्मा गांधीजी यांच्या 151 व्या जयंतीनिमित्त   स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छतेविषयी जनजागृती करणे यासोबतच त्यांच्या कार्याच्या प्रती संवेदनशील होणे, त्यांच्या कार्याला प्रतिष्ठा प्राप्त करून देणे हेदेखील महत्त्वपूर्ण उद्दिष्ट आहे.

  प्रतिष्ठान भवन उस्मानाबाद येथे हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष  नितीन काळे, नगर परिषद गटनेते  युवराज नळे, इंद्रजीत देवकते, नितीन भोसले, राजसिंह राजेनिंबाळकर, राहुल काकडे, संदीप इंगळे,सुजित साळुंके, श्रीराम भूमरे आदी उपस्थित होते.


 
Top