उस्मानाबाद / प्रतिनिधी
राहुल गांधी यांना झालेली धक्काबुक्की तसेच राहुल व प्रियंका गांधी यांना केलेल्या अटकेचा व उत्तरप्रदेश सरकारच्या दडपशाहीचा जिल्हा काँग्रेसच्या वतीने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमा जाळून उस्मानाबादेत निषेध करण्यात आला .
यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. धीरज पाटील, राजाभाऊ शेरखाने, अग्निवेश शिंदे उमेश राजेनिंबाळकर व काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.