केंद्र सरकारने इथेनॉल उत्पादनाबाबत चांगले धोरण ठरवल्याने डॉ बाबासाहेब आंबेडकर साखर कारखान्याने इथेनॉल निर्मिती वर अधिक लक्ष देण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती संस्थापक अध्यक्ष अरविंद( दादा) गोरे यांनी दिली.
कारखान्याचे १७ व्या ऊस गळीत हंगामाचा प्रारंभ ज्येष्ठ माजी संचालक शिवाजी ढोले सतीश मुंगळे अगतराव लोमटे वसंतराव कदम यांचे हस्ते विधीवत उसाची मोळी टाकून करण्यात आला त्यावेळी अध्यक्षीय भाषणात श्री गोरे बोलत होते.
यावर्षी चांगला पाऊस झाल्याने पुढील दोन हंगामात चांगले ऊस गाळप करण्याची संधी मिळणार आहे असे सांगून श्री गोरे म्हणाले यावर्षी साडेपाच लाख टन ऊस गाळप करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे कोवीड महामारीमुळे बाहेरचे ऊस तोडणी कामगार येण्याची शंका असल्याने डॉ आंबेडकर कारखान्याने कार्यक्षेत्रात 75 टक्के तोडणी वाहतूक यंत्रणा तयार केली आहे तसेच प्रथमच 20 हार्वेस्टरशी करार करून कमी दिवसात जास्तीत जास्त गाळप करण्याचे नियोजन केले आहे इथेनॉल बाबत केंद्र सरकारचे धोरण सकारात्मक असल्याने कारखान्याने केंद्र शासनाकडे रीतसर प्रस्ताव दाखल केला असून प्रस्तावास मंजुरी मिळाल्यास दोन कोटी लिटर इथेनॉल उत्पादन करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे
प्रारंभी प्रमुख पाहुणे माजी संचालकांचा सत्कार करण्यात आला प्रास्ताविक भाषणात संचालक ॲड चित्राव गोरे यांनी कारखान्याच्या प्रगतीचा आढावा घेऊन आजवर आलेल्या नैसर्गिक अडचणीवर मात करीत कारखाना मराठवाड्यात नंबर वन राहील असे नियोजन संचालक मंडळाने ठरविले असल्याचे सांगितले सूत्रसंचालन आयुब पठाण आभार प्रदर्शन ॲड निलेश बारखेडे पाटील यांनी केले
कार्यक्रमास मोजकेच सभासद शेतकरी संचालक अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते