तुळजापूर / प्रतिनिधी-
तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा येथे शिवसेनेच्या वतीने कांदा प्रश्नावर केंद्र सरकारचे डोळे उघडण्यासाठी केलेल्या जागरण गोंधळ आंदोलनात तालुक्यातील शिसेनेतील अनेक पदाधिकारी मंडळी गैरहजर राहल्याने शिवसेनेत ही सर्व काही आलबेल नाही असे दिसुन येत आहे.
महाराष्ट्र राज्यात सत्ता आल्यानंतर तुळजापूर तालुक्यात काहीसी गटबाजी वाढल्याची चर्चा आहे.त्यातच तालुक्यात सेनेचा खासदार, कळंब- उस्मानाबाद आमदाराचा कार्यक्रम सह अन्य माध्यमातून वावर वाढला आहे. या कार्यक्रमांना जुन्या शिवेसेना पदाधिकारीची गैरहजरी ही बरेच काही सांगुन जाते आहे.
शिवसेने चे महत्त्वाचे कार्यक्रम आवर्जून तिर्थक्षेञ तुळजापूरात देवीदारी घेतले जातात परंतु कांदा प्रश्न केंद्र सरकार विरोधी केलेला जागरण गोंधळ कार्यक्रम माञ तिर्थक्षेञ तुळजापूर पासुन अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या काक्रंबा गावात युवा पदाधिकारीनी घेतल्याने व यास जुन्या शिवसैनिकांनी गैरहजरी लावल्याने शिवसेनेत चाललय तरी काय याची चर्चा सर्वञ होत आहे.
अनेकांना निमञंण देवून ही त्यांनी विविध कारणे सांगुन गैरहजरी दाखवल्याची चर्चा खुद्द शिवसैनिकातुन होत आहे.शिवसेना राज्यात सत्तेवर असल्याने शिवसैनिकांकडे लक्ष दिले जात नसल्याचा आरोप शिवसैनिक करीत आहेत.त्यातच तालुकाध्यक्ष सक्षम नसल्याने व त्याचे अस्तित्व गावापुरतेच असल्याने शिवसैनिकांचे कामे होत नसल्याने शिवसैनिकांन मध्ये अस्वस्थता पसरली आहे. पालकमंञी खासदार व दोन आमदार सेनेचे असताना ही शिवसैनिकांन मधील अस्वस्थता बरेच बोलुन जात आहे.