तुळजापूर  / प्रतिनिधी-

 ९ ऑक्टोबरला केंद्र सरकार राज्य सरकारच्या निषेधार्थ तुळजापूर येथील तुळजा भवानीच्या मंदिरासमोर जागरण गोंधळ घालून मराठा समाज ठोक मोर्चाचे तिसरे पर्व सुरू होणार आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात मराठा समाजाच्या आरक्षणाची बाजू मांडण्यात कमी पडल्याने मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही. या आंदोलनात मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव सहभागी होणार आहेत, असे तुळजापुर येथील मराठा समाज आरक्षण ठोक मोर्चाच्या सदस्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

कोपर्डी येथील भगिनीस न्याय मिळावा, मराठा समाजाला शैक्षणिक तसेच नोकरीत कमाल १६ टक्के आरक्षण मिळावे किमान १३ टक्के आरक्षण मिळावे, मराठा समाजाचे आरक्षण जाहिर झाल्याशिवाय कुठली नोकर भरती करू नये, पोलीस भरती करू नये, आण्णासाहेब पाटील अर्थिक विकास महामंडळास १ हजार कोटीची तरतुद करावी, सर्वोच्च न्यायालयाने स्टे ऑर्डर शिथिल केली तर ९ ऑक्टोबरला होणारा मोर्चा रद्द करण्यात येईल, असे मराठा समाज आरक्षण ठोक मोर्चाच्या सदस्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या वेळी सज्जनराव साळुंके, सचिन रोचकरी, अर्जुनआप्पा साळुंके, महेश गवळी, आबा कापसे आण्णासाहेब क्षिरसागर, कुमार टोले, अजय साळुंके, नितिन रोचकरी, राम चोपदार, अशोक फडकरी या सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.


 
Top