आतिवृष्टीमुळे यंदा शेतांनमध्ये अद्याप वाफसा न झाल्याने व ज्यांचा झाला आहे त्यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात तण वाढल्यामुळे हे तण काढण्यासाठी जवळपास महिना लागण्याची शक्यता असल्याने, त्यानंतर रबी पेरणी करावी लागणार असुन ती केल्यास ज्वारी पिक येण्याची शक्यता कमी असल्याने त्यामुळे बळीराजा चा रबी हंगाम ही वाया जाण्याची शक्यता आहे.
अतिवृष्टी मुळे खरीपचे हाती आलेले पिक हातुन गेले त्यात जमिनीवरील मातीही वाहुन गेली आहे रान नीट करायाला व बिबियाणेखते साठी जवळ पैसा नाही त्यामुळे यंदा तालुक्यातील शेतकऱ्यांना रबी पेरणी करण्यासाठी अनंत अडचणी येत आहेत.
यंदा शेतकऱ्यांचा ऊस कांदा हरभरा गहू घेण्याकडे कल दिसून येत आहे.माञ अधाप काही ठीकाणी पंचनामे नाहीत ज्यांचे झालेत त्यांना बियाणे मिळत नाहीत त्यामुळे पेरणी करायाची तरी कशी या विवेंचनात शेतकरी पडला आहे,
तालुक्यात अजूनही काही ठिकाणी पाऊस पडत आहे त्या मुळे पेरणीसाठी पुरेसा वाफसा झालेला नाही रबी पेरणी प्रामुख्याने 15आँक्टोबर ते 31आँक्टोबर दरम्यान होत असते यंदा माञ तशी परिस्थिती नाही तण घालविण्यासाठी मजूरांचे दर परवडत नसल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात तणनाशक औषधांची फवारणी करीत आहेत. तणावर औषध फवारले किमान पंधरा दिवस तर तण वाळण्यासाठी लागतात, त्यामुळे हे वाळण्यासाठी पुन्हा शेतकऱ्यांना थांबावे लागणार आहे.
सध्या ज्यांच्याकडे पाणी आहे ते गहु , हरभरा घेवू शकतील कोरडवाहू शेतकऱ्यांचे अवघड आहे. शासनाने हेक्टरी दहा हजार मदत जाहीर केली आहे. त्यापेक्षा अनेक पट खर्च राने तयार करणे व पेरणीसाठी येणार असल्याने अनेकांनी पेरणी न करण्याचे ठरवले असुन त्यामुळे जमीनी मोठ्या प्रमाणात पडीक राहण्याची शक्यता आहे.